आठवणीतले बाबा . भाग १
मान खाली होती आणि मन मात्र स्मशानात...
वय पंधरा दहावीचा रद्द झालेला पहिला पेपर..
म्हणजे 8 तासापूर्वी पेपरात काय लिहावं, हाच जगातील सर्वात मोठा प्रश्न माझ्यापुढे होता पण नियतीला माझी वेगळी परीक्षा घ्यायची होती ती वर्ष भराची नव्हे जन्मभरा साठीची कठोर परीक्षा
भर भर आगीच्या भोवती मारलेल्या चकरा आणि धापधीशी फुटलेल्या पाण्याचा भरलेली माठ आणि नंतर त्या आगीपासून ओढून नेत दूर कुठं कोपरापर्यंत नेऊन उभं केलेलं
"राहुल आता घरी गेल्यापर्यंतर मागे वळून बघू नको" तस कुणीतरी बजावलं होत मला त्यावेळी. अग्नी दिलाय त्याने बघू देऊ नका त्याला म्हणून दोन व्यक्ती स्वतंत्र उभे होते त्यासाठी... त्याच कारण माझ्यासाठी तेव्हा गूढ होत
पण मला बघायचं होत निदान एक नजर तरी... मनात या प्रथा परंपरेचा राग येत होता.. अरे अस कुठं असते का? का बघू नये वळून? माझे पप्पा आहेत ते ..जे नंतर मला कधीच बघायला मिळणार नाही... एक दोनदा प्रयत्नही केला पण सोबत असलेल्या मोट्या व्यक्तीच्या तुलनेत माझं वय कमी पडत होत
बघू द्या बघू द्या म्हणून स्वतःशीच पुटपुटत होतो, बराच वेळ हा खेळ सुरू असल्याने एक वयस्कर व्यक्ती गुडघ्यावर वाकून डोळ्यात पाहून म्हणाली
"मोठा हो राहुल आता तुलाच बघायचे आहे सर्व, मागे बघू नको नाहीतर आबा चा जीव तुमच्यातच अडकून राहील. चांगल्या साठी च सांगतायेत सर्व"
"पण मी ऐकलं नाही- मी बघितलंच" त्याक्षणी मोठा झाल्यानंतर पहिला सर्वात मोठा निर्णय कदाचित हाच असावा, 20 25 फूट उंच ज्वाला होत होत्या, त्या ज्वालात वडील सामावलेले दिसत होते जणू ते सांगत असावेत मी आता शरीर रुपात नसलो तरी सर्विकडे आहे, आणि तीच ज्वाला मी तेवत ठेवण्याचा निर्णय घेतला. एक मात्र नक्की ठरवलेलं या दिवसाचा एक एक क्षण आठवणीत ठेवायचा अगदी कधीतरी जे अंतिम सत्य असनाऱ्या त्या ज्वाला आणि मी एकरूप होण्याची वेळ येत नाही तोवर म्हणून आजची ही उजळणी.
आजही रात्री लवकर घरी जातो, वडील असते तर रागावले असते या हेतूने. आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या निर्णय घेताना त्याच्या फोटोसमोर उभा राहून विषय समजावून सांगतो, कुठं चुकलो तर माफीही मागून घेतो. घरी आलो की दरवाजा उघडायला घरच्यांना मुलांच्या नावाने हाक मारतो, पप्पा ही करायचे तसे.. सन्नी म्हणून आवाज द्यायचे.
माझा 3।5 वर्षाचा राणा एकदा विचारत होता "बाबा तू रात्री पाठीवरून हाथ का फिरवतो, खूप टाइम."
मी हसतो एवढेच सांगतो माहीत नाही पण माझे बाबा करत होते मला तसं.
तो म्हणाला अजून काय करायचे तुमचे बाबा ?..
मग मात्र गर्दी झाली होती तेव्हा हृदयात, काय काय सांगू अस झालेलं
बँकेची सायकल घरी आल्यावर किती तरी तास कैची सायकल शिकत असायचो... पगार त्यावेळी कॅश मिळायचा देवा जवळ ठेवल्यानंतर मला तो मोजण्यासाठी मिळायचा एवढेच काय बँकेत गेल्यावर कॅशिअर काका ही मला नोटांची बंडल मोजायला द्यायचे.. राहुल 102 नोटा आहे वेवस्तीत मोज . पण असायच्या 100 च मग मात्र तारांबळ उडायची ... दर रविवारी बाजारात जाताना सोबत जायचो येताना गावहोळी चौकात कै सुरेश वाणी काकांकडे चेरी खायची... बऱ्याचदा मित्रांसोबत गावभर हिंडायचो फक्त गाव होळी चौक ते अर्बन बँक एरिया सोडून... तिकडे आम्हाला खूप व्हिलन भेटायचे... आम्ही जरासा म्हसोबाचा शेंदूर उकरून गल्लीतल्या 2 3 कुत्र्याना टीका म्हणून काय लावला..5 मिनिटात निरोप बँकेत... अनेक गोष्टी आहेत ज्या आठवल्या तरी आयुष्यभर पुरतील
या वयात राणाला कळत नसावं पण माझे भाव नक्कीच समजत असावेत कदाचित या छोट्या छोट्या वाटणाऱ्या कृती त्याच्याही मनात बिंबत असाव्यात, त्यालाही हे आठवणीत राहील की त्याचेही बाबा रात्र रात्र पाठीवर हाथ फिरवत होते
असो आज अठरा वर्ष झालीत, अजूनही स्वप्नात येतात. कदाचित त्यावेळी मागे वळून बघितलं म्हणूनच की काय...
हा दिवस म्हणजे तारीख आहे, आठवण रोजची असते
या, पुन्हा स्वप्नात बोलूया.. वाट बघतोय
तुमचा
18 वर्षांपूर्वी याच दिवशी स्मशान भूमीच्या बाहेर हाथ जोडून उभा होतो, स्मशानात भल्या मोठा लाकडाचा ढीग जळत होता हजारो ची गर्दी होती पण कुणाच्या ही तोंडांतून शब्द नव्हता, अनेक ओळखी-अनोळखी हाथांचा स्पर्श ओला रुमाल ठेवलेल्या डोक्यावरून फिरुन जाताना जाणवत होते

सन्नी- राहुल
0 9028190150